अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एप्रिल-मे २०२१ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकिट) ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शनिवारपासून (३ एप्रिल) कॉलेज लॉगईनमध्ये डाऊनलडोड करण्याकरिता उपलब्ध होतील.
या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा , असे माहिती शिक्षण मंडळाने सांगितले.
एप्रिल-मे २०२१ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता १२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावे.
प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्ता उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ता उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|