माणुसकीला काळिमा फासणारी घटना, बापाकडून मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोपरगाव तालुक्यातील करंजी परिसरात बापाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून नात्याला काळिमा फासणारे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची

घटना घडली असून बापाविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंजी परिसरातील नवरा-बायकोचे भांडण झाले असल्याने बायको माहेरी निघून गेली होती. दोन मुले व मुलगी बापाकडे राहत होती.

गेल्या आठवड्यात १४ वर्षाची मुलगी घरात झोपलेली असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तिच्या बापाने दारूच्या नशेत लज्जा उत्पन्न होईल

असे वर्तन करून तू माझे पाय दाबून दे असे बोलत जवळ झोपून अश्लील कृत्य करत बाहेर हे कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

दरम्यान घाबरलेल्या मुलीने आज हा प्रसंगी आईला मोबाईलवरून सांगितला.आईने सर्व हकीकत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविली असता नराधाम बापास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe