अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- पाच ते सहा महिन्यांपासून थकलेला पगार मागीतला म्हणून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तिघां जणांनी महादेव वगारहंडे या मजूरास लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली
असून याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महादेव विठ्ठल वगारहांडे वय २७ वर्षे राहणार बोर्डाता, वणी. जि. यवतमाळ. हल्ली राहणार क्रांती हॉटेल जवळ राहुरी फॅक्टरी. हा तरूण गेल्या ७ ते ८ वर्षांपासून देवळाली प्रवरा येथील आरोपींकडे मजूरीचे काम करत होता.
त्याला प्रती महिना १० हजार इतका पगार होता. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आरोपी हे त्याला पगार देत नव्हते. दोन दिवसांपूर्वीच होळी सण असल्याने त्याला त्याच्या घरी पैसे पाठवायचे होते.
त्यामुळे त्याने आरोपींकडे आपल्या पगाराचे पैसे मागीतले. याचा राग आल्याने आरोपींनी हॉटेल क्रांती जवळ दि. ३१ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान त्याच्या डोक्यात लोखंडी राॅड मारून गंभीर जखमी केले.
तसेच त्याचा दात पाडून लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. आणि शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
असे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी झालेला महादेव विठ्ठल वगारहांडे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी 1) देविचंद कुटे (पुर्ण नाव माहीत नाही) 2) संतोष अशोक नालकर 3) गिरीष (पुर्व नाव माहीत नाही)
सर्व राहणार देवळाली प्रवरा ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. व कलम -1 272/2021 भा.द.वि. कलम -326, 325, 323, 504, 506, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास हवालदार डि के आव्हाड हे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|