अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- २०१९-२० च्या अहवाला नुसार लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याला ९२३ कोटी रुपये कर्ज देणे आहे.
म्हणजे प्रत्येक सभासदावर ६ लाखांचा बोजा असताना शेतकऱ्यांना फसवण्याचा निर्णय कारखाना संचालक मंडळ घेत आहे. २०२१-२२ मध्ये हे देणे ११०० कोटी पर्यत जाण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण सभेत ऊस भावासंदर्भात घोषणा होईल ही अपेक्षा असताना संचालक व चेअरमन यांनी ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली. पण शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी कोर्टाची मदत घेऊ, असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले.
शेअर्स ची रक्कम १० हजारांहून १५ हजार करत असतांना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेअर्स रक्कम न वाढवता बिगर सभासदांना सभासद करून भागभांडवल वाढवण्याची मागणी, व सहवीज प्रकल्प,
डीसलरी प्रकल्प असे उपपदार्थातून ५० टक्के रक्कम भार्गव कमिटीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना नफा मिळायला पाहिजे परंतु यापेकी काहीही शेतकऱ्यांना मिळत नाही तो मिळावा, अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांच्याकडून करण्यात आली.
साखर उतारा ११.५० टक्के वरून १० टक्के आला याला जबाबदर कोण? उसाचा रस डिस्टलरीकडे वळून ऑन मनी कमिशन घुले बंधू वसूल केले जात असल्याची शंका शेतकऱ्यांना येत आहे.
कारखाना स्वतःच्या मालकीचा असल्या प्रमणे घुले बंधू वागत आहेत, यातून कारखाना स्वतःच्या मालकीचा करण्याचा त्यांचा उदेश स्पष्ट आहे.
कारखाना वाचावण्यासाठी, पोटनियम दुरुस्तीला विरोध दर्शवण्यासाठी व उसाला २८०० रुपये भाव मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुरकुटे यांनी केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|