राहूरी तालुक्यातील ‘हे’ गाव लॉकडाउन , गावानेच घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  राहुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता केंदळ खुर्द गावाने स्वयंस्फूर्तीने गाव लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत विणकारन घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरपंच मच्छिद्र आढाव यांनी दिली आहे. राहुरी तालुक्यामधे कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत.

त्यामुळे आता प्रशासनाने देखील कडक पाऊले उचललेली आहेत.त्याचबरोबर आता गावांगावांमधे देखील स्वयंशीस्तीचे पालन होताना दिसुन येत आहे.

त्यातच आता तालुक्यातील पुर्व भागातील केंदळ खुर्द येथील ग्रामस्थांनी २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत दुपारनंतर लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहातील.

तर दुध संकलन केंद्र सकाळी ६ ते ८ तर   सायंकाळी ६.३०ते ७.३०पर्यंतच चालु राहतील या व्यतिरीक्त ४ व्यक्तीपेक्षा जास्त गर्दी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच माच्छिंद्र आढाव यांनी केले आहे.

याप्रसंगी  तंटामुक्ती अध्यक्ष धोंडीराम आढाव,भोईटे बाबासाहेब, संदिप आढाव,अनिल आढाव, विकास मगर,शिवाजी आढाव ,राजेंद्र आढाव, संतोष पवार, चांगदेव मगर, महेश आढाव, विशाल आढाव, दत्तात्रय पवार,

काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, उद्धव आढाव , सोपान आढाव, डॉ .विजय आढाव, विकास आढाव , भानुदास पवार , नामदेव आढाव सतिष आढाव पंढरीनाथ आढाव विलास झिने, संभाजी आढाव ‘ गणेश आढाव राजेंद्र गुंजाळ ‘ संदिप गुंजाळ आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe