किरण खेर यांना ब्लड कॅन्सरचे निदान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी आणि चंदीगडमधून खासदार असलेल्या किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे.

मुुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. स्वत: अनुपम यांनी याची माहिती दिली. अनुपम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत लिहिले की,

अफवा पसरू नयेत म्हणून मी ही बातमी शेअर करत आहे. मी आणि सिकंदर ही माहिती देत आहाेत. किरणला मल्टिपल मायलोमा एका प्रकारचा ब्ल्ड कॅन्सर आहे.

सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. यातून ती लवकर बरी होऊन बाहेर येईल याचा आम्हाला विश्वास आहे. आमचे नशीब चांगले आहे.

किरणला चांगल्या डाॅक्टरांची टीम मिळाली आहे. ती पहिल्यापासून लढाऊवृत्तीची आहे. किरणसाठी प्रार्थना करा… आणि असेच प्रेम करत राहा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe