आता पेट्रोलची चिंता सोडा, एकदा चार्ज केल्यावर ही कार ९०० किमी चालेल !

Ahmednagarlive24
Published:

लंडन : जगभरात इले्ट्रिरक कारवर नवनवीन संशोधने केली जात असताना ब्रिटनच्या के्ब्रिरज विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एक अनोखी इले्ट्रिरक कार विकसित केली आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही कार तब्बल ९०० किमीचा पल्ला गाठू शकते. ताशी १२० किमी वेगाने चालू शकणाऱ्या या कारला ‘हेलिया’ असे नाव देण्यात आले आहे.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारची रेंज ही टेस्लाच्या कारपेक्षा दुप्पट आहे. कारचा सर्वाधिक वेग १२० किमी प्रतितास असून, सरासरी ८० किमी प्रतितास वेगाने ही कार धावू शकते. स्टँडर्ड इले्ट्रिरक व्हेईकल चार्जरने या कारला चार्जिंग केली जाऊ शकते. 

कारमध्ये ५४ चौरस फुटांचे सौरपॅनल बसविण्यात आले आहेत. कारमधून चार जण सहजपणे प्रवास करू शकतात. विद्यापीठाच्या इको रेसिंग टीमने विकसित केलेली ही कार येणारे भविष्य असल्याचे मानले जात आहे. कार्यक्रम संचालक जियोफेन जँग आणि २० पदवीधर विद्यार्थ्यांनी या कारची बांधणी केली आहे. 

ब्रिटनमधील विविध कार निर्माता व अभियांत्रिकी कंपन्यांच्या सहभागाने ही कार विकसित करण्यात आली आहे. जवळपास दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर विद्यार्थ्यांनी कार प्रत्यक्षात साकारली.

 कमी वजन व जास्तीत जास्त गुणवत्ता या बाबींवर भर देण्यात आला आहे. १९ ऑगस्ट २०१९ रोजी ही कार पहिल्यांदा लंडनच्या विज्ञान संग्रहालयात सादर करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment