अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचा आरोप करुन,कोरोना चाचणीचा अहवाल एका दिवसात मिळण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनी लवकरच एका दिवसात रिपोर्ट देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर चे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर त्याचा अहवाल येतो. तोपर्यंत स्वब देणारा बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असतो.
त्यामुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्या ने वाढत आहे. खाजगी प्रयोगशाळेत तातडीने कोरोना चाचणीचा अहवाल दिला जात असताना,
जिल्हा रुग्णालयात मात्र मोठा कालावधी लागत आहे. यापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिल्यानंतर संबंधित व्यक्तीस होम कॉरन्टाईन केले जात होते.
त्याचबरोबर पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला हातावर शिक्का मारला जायचा. सध्या अशा प्रकारे कार्यवाही होताना दिसत नसल्याने संघटनेच्या वतीने सदर प्रश्नी जिल्हा रुग्णालयात निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते.
दरम्यान आजच्या आंदोलन प्रसंगी यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे पाटील,
छावा जिल्हा सचिव गणेश गायकवाड, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे, विलास कराळे, महेमूदा पठाण आदी उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|