दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे.
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही लाभ देण्याचा विचार दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूचित केले.
दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने त्यांचे कल्याणकारी योजना लागू करण्याचे प्रयत्न आहेत.
महिलांसाठीची मोफत बस योजना मंगळवारी भाऊबिजेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली.