पिकांसाठी उन्हाळी आवर्तनाकडे शेतकर्‍यांचे नजरा खिळल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- गेल्या पंधरा दिवसांपासुन तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्यातच लाभक्षेत्रातील इंधन विहीरी अथवा विहीरींचे पाणी कमी झाले आहे. या कारणांनी शेतातील उभी पिके धोक्यात आली आहेत.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील उभी पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. या पिकांसाठी उन्हाळी आवर्तनाकडे शेतकर्‍यांचे नजरा खिळल्या आहेत.

लोकप्रतिनिधी हे आवर्तन घेण्यासाठी कधी आग्रह धरणार याकडे कोपरगाव तसेच राहाता तालुक्याचे लक्ष लागले आहे. गोदावरीच्या दोन्ही कालव्यांवर एकूण 3 हजार हेक्टर क्षेत्रावर पिके उभी आहेत.

ऊस, काही ठिकाणी फळबागा व चारा पिके उभी आहेत. त्यामुळे एका आवर्तनासाठी दोन टिएमसी पाणी गृहीत धरले तरी चार टिएमसी पाणी दोन आवर्तनासाठी लागु शकते.

त्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाचे आवर्तन होणार असल्याने पाण्याची बचत होईल. उन्हाळी आवर्तन असल्याने कदाचित पाण्याचा वापर कमी जास्त प्रमाणात होईल. पण दोन हंगामाचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe