अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील दगडाच्या खाणीतून बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी सुभाष रावबा गिते
यांना संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी एक कोटी 8 लाख 13 हजार 880 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळे येथील खाणीतील दगड हा स्टोन क्रेशर करीता उपयोग करण्यात येत असतो. सुभाष रावबा गिते यांनी सदर जमिनीतून 2009 पासून बेकायदेशीरपणे दगडाचे उत्खनन करून पर्यावरणाचे व शासनाचे नुकसान केले आहे
याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गंभीरे यांनी तहसीलदार, संगमनेर यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या. स्टोन क्रेशर बंद करून आज पावेतो केलेल्या उत्खननाची नुकसान भरपाई व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली. सदर खाणीतील ईटीएस मोजणीनुसार रॉयल्टी रक्कम 1 कोटी 8 लाख 13 हजार 880 शिल्लक असून सदर रक्कम शासन जमा करण्याबाबत खाण मालकास कळविले.
मात्र खाणमालक यांनी हलगर्जीपणा तसेच दांडगाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामळे तहसिलदारांनी दि. 16 मार्च 2021 रोजी सुभाष रावबा गिते यांना एक कोटी आठ लाख 13 हजार 880 इतका दंड ठोठावला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|