आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही.
सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागाने या निर्णयासंबंधी माहिती दिली आहे.
छोटे कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागेल.
या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही निर्णय घेण्यात आले आहे. यानुसार या अंतर्गत जमीन धोरणही मंजूर करण्यात आले आहे. भूमिहीन लोकांना शेतजमीन आणि घरं बांधण्यासाठीदेखील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.