संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-  संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. राज्यावरील कोरोनाचं संकट आज सगळ्यात मोठं आहे.

या संकटाचा मुकाबला करताना, सरकार आणि नागरिक दोघेही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून आपापली कर्तव्ये पार पाडतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केलं. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन केलं.

महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. आज तीनशे वर्षांनंतरही महाराजांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत. महाराजांनी दिलेल्या विचारांवर राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे.

संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येतं हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलं. महाराजांचं हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी,

शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe