अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे.
स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!,
असे भावनिक ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एकीकडे रश्मी ठाकरे रुग्णालयात आहेत, तर दुसरीकडे आदित्य यांनाही कोरोनाची बाधा झालीय. उद्धव ठाकरे यांची दोनवेळा एन्जिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रकृती विषयी पूर्वीपासूनच जागरूक आहेत.
ते नियमित व्यायाम करतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात असतात. तर, त्यांच्या ह्रदयात अनेक स्टोन्स असतानाही ते ज्या धीरदोक्तपणे महाराष्ट्र सांभाळतायंत, यावरुन आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना सलाम केला आहे.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या, कोरोनाला रोखण्यात अपयश आलेलं महाविकास आघाडी सरकार आणि पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभारले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले.
तसेच, तुमचं वजन वापरुन, केंद्राकडून राज्याचे पैसे आणावे, असा खोचक टोलाही लगावला. त्यानंतर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याचं आव्हाड यांनी कौतुक केलंय.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|