अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या केसेसमुळे बांगलादेशमध्ये सोमवारपासून एक आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
बांगलादेशने सोमवार, ५ एप्रिलपासून ७ दिवस दुसऱ्यांदा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान केवळ आपत्कालीन सेवांसाठी सूट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर बांगलादेशात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी दुसर्यांदा संपूर्ण लॉकडाऊन करण्यामागचा हेतू म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखणे, असा असल्याचे सांगितले जात आहे.
बांगलादेश सरकारच्या मते, सोमवारपासून आठवड्याभरासाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादीर यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार,
कोरोनाची नवी दूसरी लाट रोखण्यासाठी सरकारने ७ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान या काळात देशातील सर्व कार्यालये आणि कोर्ट बंद राहणार आहेत. परंतु, उद्योग आणि मिल्स रोटेशनपद्धतीने सुरू राहणार असल्याचं कादीर यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|