जामखेड : अनेक वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या २० वर्षीपासून एक निष्ठेने काम केले. देशात व राज्यात पुरोगामी आघाडी सरकारची सत्ता होती आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पक्षाचे होते.
२५ वर्षे सतत सत्तेच्या विरोधातील आमदार असायाचा त्यामुळे या मतदारसंघातील कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे व सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.मात्र आता आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून सक्षम आमदार मतदारसंघाला लाभल्याने यापुढे तालुक्याचा चांगला विकास होईल. असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचा राष्ट्रवादीचे जिल्हाउपअध्यक्ष सुरेश भोसले यांनी त्यांच्या सत्कार केला, यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, तरुण पिढीला रोजगार उपलब्ध होत नसल्याने हा मतदारसंघ कायम विकासापासून वंचित राहीला, तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले नाही.परंतू खा.शरद पवार यांच्यावर एक निष्ठेने प्रेम करणारे तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाबरोबर राहीले.
त्यामुळे नवनिर्वाचित आ.रोहित पवार यांच्या विजयामध्ये जामखेड तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी आणि युवकांनी व महिलांनी प्रमाणात कष्ट घेतल्यामुळेच यश मिळाले.