अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या निबोंडी गावात घडली.
आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात मुरळीचे काम करते. नगरला एका कार्यक्रमासाठी ती आपल्या सहकाऱ्यासह आली होती. येथील कार्यक्रम आटोपून ते घराकडे दुचाकीवरून परत जात होते.
रस्त्यात निंबोडी शिवारात लघुशंकेसाठी ते थांबले. तेव्हा तेथे तिघे जण आले. त्यांनी दोघांना बळजबरीने ओढळून जवळच्या शेतात नेले. महिलेसोबतच्या सहकाऱ्याला पकडून ठेवून तिघांनी महिलेवर बलात्कार केला.
त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.त्यानंतर महिलेने भिंगार कँप पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
अक्षय कचरू माळी (रा. निंबोडी, ता. नगर) व आकाश पोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नीलेश पोटे फरार आहे.ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|