कोपरगाव : ‘विहिरीतील चोरीस गेलेली मोटर तुला देतो. तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव. तसेच तुला काही कमी पडू देणार नाही’
असे म्हणत संतोष तुळशीराम वायसे (रा. सोनेवाडी, ता.कोपरगाव) या व्यक्तीने एका महिलेचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग केला.
दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.