लस घेऊनही मनपा आयुक्त झाले कोरोनाचे शिकार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-औरंगाबाद महापालिकेचा गाडा हाकणारे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाली आहे.

काहीसा त्रास होत असल्यामुळं पांडेय यांनी शनिवारी कोरोनाची RTPCR चाचणी केली होती. रविवारी सकाळी आलेल्या रिपोर्ट्समध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आस्तिक कुमार पांडेय यांनी कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तसंच औरंगाबाद मनपाच्या कामकाजावर यामुळं आणखी परिणाम होणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे. आयुक्त पांडेय यांना काल ताप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी लगेच आरटीपीसीआरसाठी स्वँब दिला. त्यांचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला.

माञ त्यांच्यात नॉर्मल सिम्टम्स् जाणवले आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान आयुक्त पांडेय यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केल्याचे सूञांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत औरंगादमधील आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता पांडेय यांनाही लागण झाल्यानं, काहीसं काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News