निवडणुकासाठी यंत्रणांचा गैरवापर करायचा नसतो; रोहित पवारांचा विरोधकांना खोचक टोला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कर्जत – जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना समोर आली.

हे अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने जरी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले असले तरी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे सामान्य मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण होते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

निवडणुका या एखाद्या खेळासारख्या असतात. त्या तशाच खिलाडूवृत्तीने लढवायच्या असतात. पण यामध्ये दडपशाही आणि यंत्रणांचा गैरवापर झाला तर ती लोकशाही राहत नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांचाही खेळ होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज आहे, असे रोहित पवार यांनी नमूद केले. पवार पुढे म्हणाले कि, की, सध्या आसामबरोबर तमिळनाडूही निवडणुकांना सामोरं जात आहे.

तमिळनाडूमध्ये जरी ईव्हीएम सापडले नसले तरी डी.एम.के पक्ष प्रमुख एम. के स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर ऐन निवडणुकीत छापे मारण्याची घटना ही अनेक शंका उपस्थित करणारी आहे.

इन्कम टॅक्स विभाग, ई.डी यासारख्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी लोकांची मने दूषित करण्यासाठी व निवडणुकांनंतर दबाव टाकून सत्ता स्थापन करण्यासाठी या संस्थांचा उपयोग केला जातो का? अशी सार्वत्रिक चर्चा आता ऐकायला मिळते, असेही पवार यांनी सांगितले.

एकटी लढतेय बंगालची वाघीण :- पश्चिम बंगालचा विचार करायचा झाल्यास एकट्या ममता बॅनर्जींच्या विरोधात एक मोठी शक्ती साम, दाम, दंड, भेद आणि सत्ता याचा वापर करताना दिसतेय. पण बंगालची ही वाघीण न डगमगता एकटी या ताकदीच्या विरोधात धैर्याने उभी आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News