दूध बिसलरीपेक्षा स्वस्त, दूध उत्पादकांचे हाल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अवकाळी पाऊस, गारपीट व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय दरवर्षी तोट्याचा ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळले.

मात्र, यातही येणाऱ्या अडचणी काही बळीराज्याची पाठ सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. माणसाच्या वैरणाची (गव्हाची) ज़नावरांच्या वैरणाचा खर्च महागला आहे.

गव्हापेक्षा जनावरांना पोषक आहार म्हणून वापरली जाणारी सरकी पेंड महाग झाल्याने आणि बिसलरीपेक्षा दूध स्वस्त असल्याने उत्पादन खर्च आणि उत्पादित मालाची विक्री यातील फरकाचा ताळमेळ कसा बसवावा आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा,

असा मोठा प्रश्न दूधउत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. परिणामता शेती कसण्यासाठी लागणाऱ्या जनावरांची संख्या कमी झाली आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले.

अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये जम बसवला असून, सर्वसाधारण दूध उत्पादकाकडे आज वीस ते तीस लिटर दूध सर्रास उपलब्ध आहे. मात्र, येथेही काही शेतकऱ्यांच्या नशिबाची साडेसाती संपता नाही.

उत्पादन खर्च आणि उत्पादनातून मिळणारी रक्कम, यात दिवसेंदिवस मोठी तफावत पडत चालली आहे. आज घडीला माणसाच्या वैरणाची म्हणजे गव्हाला १८ ते २३ रुपये किलो भाव आहे. तर गुरांचे वैरण म्हणजे सरकी पेंड २५ ते ३० रुपये किलोपर्यंत पोहचली आहे.

तर ग्रामीण भागात सरकारी किवा खाजगी दूध संकलन केंद्रावर पतवारी पाहून १८ रुपये प्रतिलिटर दूध खरेदी केले जात आहे. यापेक्षा फिल्टर बाटलीबंद पाण्याची किंमत कितीतरी जास्त आहे.

याशिवाय जनावरांच्या चाऱ्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईमुळे जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करू पाहणाऱ्या किंवा करीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांंमध्ये कमालीची निराशा पसरली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe