ग्राहकांना फाटलेल्या नोटा दिल्यास बँकांना होणार आर्थिक दंड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-ग्राहकांना खराब किंवा फाटलेल्या नोटा देणाऱ्या बँकांना (Bank) आता मोठा दंड भरावा लागणार आहे.

100 रुपयांपर्यंतच्या खराब किंवा फाटलेल्या नोटेला 50 ते 100 रुपयांचा दंड (Fine) बँकांना भरावा लागणार आहे.

क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserv Bank of India) ही नवी मार्गदर्शक सूचना जारी केली असून 1 एप्रिलपासून ती देशभरात लागू झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शकतत्त्वांमध्ये कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खराब किंवा फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्यास नकार दिल्याच्या पाच तक्रारी असलेल्या बँकेला त्वरित पाच लाख रुपये दंड भरावा लागेल.

नाणी जमा न केल्याबद्दल किंवा न दिल्याबद्दल आरबीआय एक लाखांचा दंड वसूल करेल. 50 रुपये किंवा त्यापेक्षा कमी नोटा घेण्यास नकार देणाऱ्या बँक शाखेलादेखील याच प्रकारात दंड ठेवण्यात आला आहे.

बँका एका महिनाभरात दंडाविरूद्ध अपील करु शकतात असं आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केलंय.

मात्र नवीन, प्रशिक्षण नसलेले कर्मचारी, माहितीचा अभाव, सुधारात्मक उपाययोजना केल्या आहेत किंवा युक्तिवादावर दंड माफी यासारख्या गोष्टीवर दंड कमी होणार नाही. अशा स्वरुपाचे अर्ज फेटाळले जातील.

बनावट नोटांबाबत कठोर भूमिका :- बँका बनावट नोटांची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो तसंच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट म्हणजे एफआययूला देण्यात येईल.

बनावट नोटा नष्ट करणं किंवा ग्राहकाला परत करणं हा एक गंभीर गुन्हा मानला जाईल. असं करणार्‍या कर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद मानली जाईल आणि त्याविरोधात कारवाई केली जाईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe