एका दिवसात रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- कोरोनाची लाट आल्यानंतर राज्यात प्रथमच एका दिवसात रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला.

रविवारी ५७,०७४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २७,५०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३० लाख १० हजार ५९७ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २२२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५५,८७८ झाली आहे.

राज्यात आता ४ लाख ३० हजार ५०३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण २५ लाख २२,८२३ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

विदर्भात रविवारी ८३५३ नवे कोरोना रुग्ण आढळले तर ८९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पूर्व विदर्भातील ६९ जणांपैकी नागपूरच्या ६२ तसेच चंद्रपूर व वर्धा येथील प्रत्येकी ३ तर भंडारा येथील एकाचा समावेश अाहे.

तसेच पश्चिम विदर्भात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला असून यात यवतमाळ ८, बुलडाणा ६, वाशीम ३, अकाेल्यातील २ तर अमरावती येथील एकाचा समावेश अाहे.

रविवारी बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १०२२ तर यवतमाळ ४२५, अमरावती ३०३, अकोला २६६ वाशीम जिल्ह्यात २३४ नवे रुग्ण आढळले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|