मोदींचा मोठा निर्णय कोरोनावर नियंत्रणासाठी करणार असे काही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचसूत्री अर्थात 5 कलमी कार्यक्रम आखला आहे. पंतप्रधानांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण मोहीम गांभीर्याने आणि कटिबद्धतेने राबविल्यास कोरोनाचा प्रसार रोखता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी 6 ते 14 एप्रिलदरम्यान देसभरात एक विशेष अभियान राबविले जाणार आहे.

या अंतर्गत मास्कचा वापर, खासगी आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता किती आवश्यक आहे, याची जाणीव लोकांना करून दिली जाणार आहे.

याचबरोबर, पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय पथकाला महाराष्ट्राचा दौरा करण्याची सूचनाही केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe