निर्बंध पाळा, कठोर लॉकडाऊन टाळा – महसूलमंत्री थोरात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. आठवड्याच्या शेवट्या दोन दिवसात लोकं मोठ्याप्रमाणावर बाहेर येत असतात, एकत्र येतात, काही कार्यक्रम देखील मोठ्याप्रमाणावर असतात याचा परिणामा संसर्ग वाढण्यावर होत असतो.

त्यामुळे हे आठवड्याचे शेवटचे दोन दिवस लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू करण्यात आले आहे. जनतेने निर्बंध पाळावे आणि लॉकडाऊन टाळावा,

असे आवाहन काँग्रेस नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. लॉकडाऊन कोणालाच नको आहे, कारण लॉकडाऊनमध्ये गरिबांचे खूप हाल झाले. त्यांचा रोजगार गेला, त्यांचे उत्पन्नाचे साधन गेले.

व्यापारी, कारखानदारांचेदेखील मोठे नुकसान झाले. अर्थव्यवस्था अडचणीत आली. लॉकडाऊनचे दुष्परिणाम देखील खूपच मोठे असतात, हे नाकारता येणार नाही म्हणून कडक निर्बंध आपण लागू करत आहोत.

त्यामध्ये जर आपण संसर्ग रोखू शकलो तर शेवटचा पर्याय जो आहे तो लॉकडाऊन आपण टाळू शकतो. परंतु शेवटचा पर्याय हा लॉकडाऊन असतो हे देखील आपल्याला विसरून चालत नाही असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News