अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-पत्रकारास फोन करून धमकी देणार्या भिवंडी (जि. ठाणे) पोलीस स्टेशनच्या अधिकार्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेना अहमदनगरच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
भिवंडी, शांतीनगर (जि. ठाणे) पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी रवी पाखरे यांनी फोन करून ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांना अरेरावी करून धमकी दिली.
पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांना धमकावणे लोकशाहीला घातक असून, या घटनेचा लहुजी शक्ती सेना अहमदनगरच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सुपारी पोलिस वांझेचा कारणामा सुरू असताना दुसरा वांझे होण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला असून,
अशा पोलिस अधिकार्यांचे त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, पत्रकार शेलार व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|