अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार म्हणून पत्रकार बाळ ज. बोठे ला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आले.
त्यानंतर बोठे पोलिस कोठडीत असताना त्याने त्याला मदत करणार्यांची नावे तपासामध्ये पोलिसांना सांगितलेली आहेत. बाळ बोठेच्या संपर्कात आलेल्यांची पोलिसांनी आजपासून चौकशी सुरू केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/Bal-Bothe-3.jpg)
बोठेला मदत करणार्यांमध्ये शहरातील मोठ्या उद्योजकांसह अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. आरोपी बोठे फरार असताना त्याच्या संपर्कात राहून या सहा जणांनी त्याला कोणती मदत केली,
आरोपी बोठेच्या वास्तव्याबाबत त्यांना माहिती होती का अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे बोठे मदत करणार्यांनी दिली आहे. आरोपी बोठे फरार असताना त्याच्यासंपर्कात शहरातील सहा जण होते.
या सहा जणांना जरे हत्याकांडाचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी नोटीस पाठवून जबाबासाठी बोलावले. सोमवार दि. 5 मार्च रोजी या सर्वांना जबाबासाठी तपासी अधिकार्यांच्या दालनात हजेरी लावावी लागली.
सोमवारी दुपारपर्यत दोन जणांनी हजेरी लावली असून इतर चौैघे दुपारपर्यत आले नव्हते. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. तीन महिने पसार असलेल्या बोठेला पोलिसांनी हैदरबादेतून अटक केली.
अटकेनंतर त्याच्या चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या. त्याचा संपर्कात नगरमधील पाच जण असल्याचे पोलिसांना कळाले.
त्यानंतर पोलिसांनी आता एका मागोमाग एकाला चौकशीसाठी बोलविले पोलिसांना सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती, मात्र पोलिसांनी कॉल डिटेल्सचा सीडीआर दाखविताच त्याने संपर्काबाबतची माहिती देण्यास सुरूवात केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|