दुःखद ! अजिंक्य रहाणेची इच्छा अधुरीच राहिली …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे त्याच्या आजीला भेटण्यासाठी संगमनेरला जाणार होता. मात्र, ही त्याची इच्छा अधुरीच राहिली आहे. अजिंक्यचा आजीचे निधन झाले आहे.

जिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई बाबूराव राहाणे यांचे आज निधन झाले. अजिंक्यसाठी आजी ही कुटुंबातील सर्वात जवळची व्यक्ती होती. एखाद्या मोठ्या दौऱ्यानंतर अजिंक्य आपल्या आजीला भेटायला जायचा.

अजिंक्यला आपल्या आजीची आणि गावाची ओढ लहानपणापासून होती. भारताचा कर्णधार झाल्यावरही तो आपल्या आजीपासून दुरावला नाही. व्यस्त क्रिकेटच्या कार्यक्रमातून वेळ काढून अजिंक्य आपल्या आजीची भेट घ्यायला गावी जायचा.

त्यामुळे अजिंक्यचे त्याच्या आजीबरोबर फारच चांगले नाते होते. पण आज सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले.

‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या सोहळ्याला अजिंक्य रहाणे आला होता. यावेळी त्याने आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ”कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली की मी संगमनेरला जाणार आहे.

माझी आजी तिथे असते, खूप दिवस झाले तिलाही भेटलेलो नाही. त्यामुळे वेळ मिळाला की, मी नक्की संगमनेरला येईन.” असे तो म्हणाला होता.

ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर तुझ्या सोसायटीनं जंगी स्वागत केलं; पण आता संगमनेरलाही तुझं स्वागत करायचं आहे, तर कधी वेळ देशील? या प्रश्नावर त्याने हे उत्तर दिले होते. आज अजिंक्यच्या संगमनेर येथील आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe