अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-माझ्या तरुण मुलाने मटका जुगाराच्या आहारी जाऊन लाखो रुपयांचे कर्ज करून ठेवले, अद्याप मुलाचे लग्न व्हायचे आहे
पण कर्जापायी मुलगा आत्महत्येच्या विचारात होता म्हणून मी माझी स्वतःची शेतजमीन विकून हे मोठे कर्ज भरले मात्र लोकांच्या प्रपंचाशी खेळणारा हा मटका व्यवसाय बंद कधी होणार?
असा त्रस्त सवाल जमीन विकलेल्या या पित्याने स्वतःचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर करतानाच विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या त्रस्त पित्याचा मुलगा अविवाहित आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून माझा मुलगा मटका या जुगाराचे नादी लागल्याची माहिती मला मिळाली आहे. मुलाने मला न समजता सोनई, शिंगणापूर, घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे जाऊन तेथील पेढीवर दररोज लाखो रुपयांचा खेळ केला मात्र यात तो फेल होत गेला.
मग मिळेल तेथून कर्ज उपसण्यास मुलाने सुरुवात केली व कर्जाच्या रकमेतून मुलगा दररोज दिवस-रात्र मटका खेळत होता.
मटक्यामुळे मुलाचा व्यवसाय पूर्ण बसला. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने तो घरातच तोंड लपवू लागला. अद्याप त्याचे लग्न करायचे आहे परंतु मुलाची आत्महत्या नको म्हणून मी स्वतःची जमीन विकून सर्व कर्ज भरून टाकले.
मी सुशिक्षित व्यापारी लाईनचा शेतकरी असून माझी जमीन गेली परंतु या सर्व घटना होत असताना या भागात हा ‘मटका’ एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालतोच कसा?
असा माझा सवाल असून याबाबत वृत्तपत्रातून आवाज उठवून मटका कायमस्वरूपी बंद करण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन त्याने पत्रकारांना केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|