अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-पारनेर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंधरा आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे यापूर्वी दोन आरोपींना कोरोना संसर्ग झाला आहे.
त्यामुळे कोरोना बाधीत आरोपींची संख्या सतरा झाली आहे. पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने केल्या नंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
उपचारा दरम्यान या आरोपीची कोविड चाचणी करण्यात आली .या चाचणीतून आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच या आरोपीच्या पोटात पाणी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.
त्यामुळे या आरोपीला पुढील उपचारासाठी ससून पुणे रुग्णालयात हलविण्यात आले न्यायालयीन कोठडीतील आरोपी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर
पारनेर पोलीस ठाण्याच्या इतर बराकींमध्ये असलेल्या पोलीस व न्यायालयीन कोठडीत असलेल्या ४६ आरोपींची कोविड चाचणी करण्यात आली.त्यापैकी १५ आरोपींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|