कौतुकास्पद ! लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा,

अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची बैठक झाली.

यावेळी कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी ८८ लाख डोसेसचा वापर झाला आहे.

महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे.

सोमवारपर्यत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे,

अशी माहिती यावेळी देण्यात आली. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून

येथे प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत.

राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe