अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्व जेष्ठांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस यांना प्राधान्यक्रमाणे देण्यात आली आहे.
आता ४५ वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. बहुतेक नेत्यांनी लस घेत लोकांनी लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.
यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका एस. आर. शेळके यांनी हजारे यांना ही लस दिली.
सकाळी ११ वाजण्याच्या सुुमारास हजारे ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर परिचारिका शेळके यांनी त्यांना लस दिली.
लसीकरणानंतर दोन दिवस त्रास होण्याची शक्यता असल्याने अण्णांनी आराम करणे पसंत करावे, अशी विनंती डॉ. लाळगे यांनी यावेळी केली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून नागरिकांनी सहकार्य केले तरच त्यात यश येणार असल्याने नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|