अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोपरगाव शहरासह तालुक्यात 4 एप्रिल रोजी सापडलेल्या 137 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
त्यात 63 तर खासगी लॅब मधील 27 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 40 असे 130 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दरम्यान गेल्या 24 तासात कोपरगावात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खडकी येथील 56 वर्षीय महिला व वाणी सोसायटी येथील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात 6 एप्रिल पर्यंत 5 हजार 317 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 522 रुग्ण बरे झाले आहे.
तसेच 713 अॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत एकुण 25 हजार 385 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|