कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहताच देवळाली प्रवरा येथे कोव्हिड सेंटर सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वत्रच कोव्हीड सेंटर सुरु करण्यात येत आहे.

यातच देवळाली प्रवरा येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे देवळाली प्रवरासह पंचक्रोशीतील करोना रुग्णांना जवळच उपचार घेणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.

सत्यजित कदम फाउंडेशन च्या पुढाकाराने नगरपरिषदेने उभारलेल्या बाजारतळा जवळील इमारतीमध्ये कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यात आली.

हे सेंटर काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी असलेल्या सुविधा भविष्यकाळाचा विचार करता तशाच ठेवण्यात आल्या होत्या.

गेली काही दिवसांपासून नगरपरिषद हद्दीत व परिसरामध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने या ठिकाणी असलेले सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती.

या सेंटरचे उदघाटन चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा अगदी कमी खर्चामध्ये देण्यात यावी, अशा सूचना कदम यांनी केल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe