अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती.
एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल?,
असा सवाल करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही महिला नेत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर रंगले आहे.
राज्याचे नूतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चित्रा वाघ यांनी,महाराष्ट्रात महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलत घटनांची तात्काळ दखल घ्याल ह्या अपेक्षांसह मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
त्याला चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलं. चाकणकर म्हणतात, कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे.
कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत, असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|