दहावी पाससाठी उत्तर मध्य रेल्वेत भरतीची संधी ; परीक्षा नाही कि मुलाखत नाही , ‘असा’ करा अर्ज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-उत्तर मध्य रेल्वेने उत्तर प्रदेशातील झांसी येथे विविध ट्रेड्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 480 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे.

या रिक्रूटमेंट ड्राइवद्वारे उत्तर मध्य रेल्वेमध्ये फिटर, वेलडर, मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण 480 पदे नियुक्त केली जातील. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 16 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

 पद संख्या- 480

योग्यता :- या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासह संबंधित ट्रेड मध्ये ITI सर्टिफिकेट असावे.

वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल.

 एप्लीकेशन फीस

  • जनरल- 170 रुपये
  • SC/ST आणि महिला- 70 रुपये

निवड प्रक्रिया :- या पदांसाठी कोणत्याही लेखी परीक्षा आणि मुलाखतीची गरज नाही. यासाठी उमेदवारांची निवड दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

 आवश्यक तारखा

  • अर्ज प्रारंभ तारीख – 17 मार्च
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 एप्रिल

अर्ज कसा करावा ?:-  या पोस्टसाठी उमेदवार mponline.gov.in या पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. कृपया अर्जापूर्वी उमेदवारांची सूचना वाचा. अर्जात चूक असल्यास ते नाकारले जाऊ शकते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe