अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली, राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. रोहिदास दातीर यांनी आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता यावरून राजकारणही पेटण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान दातीर यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान श्रीरामपूर येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका पत्रकारांचे अपहरण करुन हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रोहिदास दातीर यांचे मंगळवारी दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसवले आणि निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली.
दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली.सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत.
आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. घटनेमुळे राहुरी शहरात व तालुक्यात दहशतीचे वातावरणात झाले आहे.
दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष होते. ते स्वत: एक साप्तहिक चालवत असे. त्यातून ते नेहमी समाजातील काही अन्यायकारक घटनांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांनी संघटनेच्या व साप्तहिकाच्या माध्यमातुन अनेक पत्रकारांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते. त्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले.
रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली होती. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे.
यातील प्रकरणातूनच त्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याची चर्चा सुरु आहे. दातीर यांच्या हत्येमुळे पत्रकरीता क्षेत्रात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|