अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे, शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी ‘वेटिंग’ करावे लागत आहे.
नेप्ती नाकाजवळील स्मशानभूमीमध्ये अनेक पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात येत असल्याने तेथील यंत्रणा व जागांच्या मर्यादामुळे अंत्यसंस्कारांसाठी थांबून राहावे लागत आहे.
असे भयाण चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोनाबाधितांवर येथील अमरधाममध्ये अंत्यविधी केला जातो. त्यासाठी महापालिकेने दोन विद्युत दाहिन्यांची व्यवस्था केलेली आहे. साधारणपणे एका मृतदेहासाठी दीड तासांचा कालावधी लागतो.
सकाळी १० वाजता दोन्ही विद्युत दाहिन्या सुरू करण्यात आल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत १४ मृतदेहांवर अंत्यविधी केला गेला. कोरोनाबाधित रुग्णांचा अकडा बुधवारी काहीसा कमी झाला.
रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांचा आकडा वाढला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
हा आकडा मंगळवारी १३ होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी हा अकडा अचानक वाढला. त्यामुळे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे दिवसभर वेटिंग होती. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|