इंदुरीकर महाराजांचे समर्थक म्हणतात, कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरूद्ध खटला चालवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने रद्द ठरवला.

त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ‘कसला गुन्हा, कीर्तन पुन्हा’! अशा शब्दांत सोशल मीडियातून पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

तर खटला रद्द झाल्यामुळे इंदुरीकर महजारांचा अकोले तालुक्याच्यावतीने भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही इंदुरीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

गेल्या वर्षी कीर्तनातून पुत्रप्राप्तीसंबंधी वादग्रस्त व्यक्तव्य करून पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या तक्रारीवरून आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या जिल्हा स्तरीय समितीच्या शिफारशीवरून आरोग्य विभागाच्यावतीने त्यांच्याविरूद्ध संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावर कनिष्ठ न्यायालयाने खटला चालिवण्याचा आदेश दिला होता. याविरोधात इंदुरीकरांच्यावतीने सत्र न्यायालयात पुनपरिक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने तो मंजूर करून खटला चालविण्याचा आदेश रद्द ठरवला.

याबाबत इंदुरीकर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे कीर्तनाचे कार्यक्रमही बंद आहेत. इंदुरीकर आणि त्यांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांचे सत्कार केले जात आहेत.

अकोले तालुक्याच्यावतीने भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही इंदुरीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

आतापर्यंतच्या प्रवासात भाजपने साथ दिली, तशीच यापुढेही दिली जाईल, अशी ग्वाही नेत्यांनी इंदुरीकरांना दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe