‘त्या’ प्रकरणात महाराजांना दिलासा मात्र चॅनेल्सला नोटीसा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना काही दिवसांपूर्वी लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयातील खटला रद्द करण्यात आल्याने  दिलासा मिळाला होता.  

मात्र, इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे यांच्याकडून युटुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांचे कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनेल नसल्याचे म्हटले होते. किर्तनामध्ये समाजप्रबोधनाच्या भावनेतून बोलतो.

युटयुब चॅनेलवरुन माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका युटुयब चॅनेलच्या चालकांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचेही इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले होते.

आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे आणि व्हिडीओमध्ये छेडछाड करुन प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत केली होती.

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास कोरोनामुळे संथ गतीनं सुरु होता. परंतु, फेब्रवारी पासून तपास जलदगतीने चालू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत मोठ्या संखेने किर्तनाच्या व्हिडीओच्या युट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत.

पोलिसांकडून काही मोठ्या युट्युब चॅनेलला नोटीस पाठवल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात महाराज सुटले मात्र ते चैनेलवाले अडकले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe