अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- फोर्ब्सने भारतीय धनकुबेरांची यादी जाहीर केली असून त्यात रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावर आहेत. तर गौतम अदानी दुसर्या स्थानी आहेत.
यात मुकेश अंबानी यांची संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. तर या पाठोपाठ अदानी यांची संपत्ती 50.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
विशेष म्हणजे या यादीत सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील झाले आहेत. तसेच सन फार्मास्युटीकलचे दिलीप संघवी सुद्धा पहिल्या दहात सामील आहेत.
भारताच्या 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर –
- मुकेश अंबानी – त्याची एकूण संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स आहे. अंबानी गॅस आणि तेलसह दूरसंचार आणि रिटेल सेक्टर मध्येही आहेत.
- गौतम अदानी – या यादीत गौतम अदानी दुसर्या क्रमांकावर आहे. अदानी यांची एकूण मालमत्ता 50.5 अब्ज डॉलर्स आहे.
- शिव नाडर – या यादीत हे तिसऱ्या स्थानी असून त्यांची संपत्ती 23.5 अब्ज डॉलर्स आहे.
- राधाकृष्ण दमानी – या यादीत राधाकृष्ण दमानी चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती 16.5 अब्ज डॉलर्स आहे.
- उदय कोटक – या यादीत पाचव्या क्रमांकावर उदय कोटक आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत बँकरची नेटवर्थ 15.9 अब्ज डॉलर्स आहे.
- लक्ष्मी मित्तल 14.9 अब्ज डॉलर्ससह सहाव्या क्रमांकावर आहेत.
- कुमार बिर्ला 12.8 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर आहेत.
- सायरस पूनावाला 12.7 अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे.
- दिलीप शांघवी 10.9 अब्ज डॉलर्ससह नवव्या स्थानावर आहे.
- सुनील मित्तल आणि त्यांचे कुटुंबीय 10.9 अब्ज डॉलर्ससह दहाव्या क्रमांकावर आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|