अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज (दि. ८) करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
स्वतः हा उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता.
कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचं काही कारण नाही. लस घेताना कळतही नाही. कोरोनाचा धोका परत वाढू नये, त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी,
असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिली लस घेतल्यानंतर केलं होतं. दरम्यान, यापूर्वी आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला.
त्यावेळी त्यांनी जे पात्र आहेत अशा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|