अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
तसा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. लाॅकडाऊनच्या नियमावलीमुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे.
लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. यामुळे हतबल झालेल्या व्यापाऱ्यांनी शासनाला मदतीची हाक दिली आहे. आम्ही कोरोनाबाबतचे शासनाचे सर्व नियम पाळू.
दिवसभरातील काही तास तरी दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन कर्जत शहरातील व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना दिले.
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून व्यापारी, इतर छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. सर्व व्यवहार आता काहीसे सुरळीत सुरू झाले होते. मात्र पुन्हा व्यवहार बंद झाल्याने सर्वच व्यापारी अडचणीत आले आहेत.
शासनाच्या सर्व नियमांना व्यापारी बांधवांचा पाठिंबा आहे. दुकाने बंद करू नयेत. दररोज काही तास तरी दुकाने सुरू ठेवण्यात परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|