लसीचा तुटवडा : खासदार उदयनराजे भोसले यांचा अजब दावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- फॅमिली प्लॅनिंग न केल्यामुळे राज्यात कोरोना लसचे नियोजन होऊ शकले नाही, असा अजब दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. साताऱ्यामध्ये लसीचे सर्व डोस संपले आहेत.

त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. त्यामुळे आता साताऱ्यामध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरु होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता त्यांनी हा अजब दावा केला. राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत लसीचे डोस संपल्याने लसीकरण थांबवण्याची वेळ आली आहे. साताऱ्यात सर्वात आधी लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत.

राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात एकूण 446 कोरोना लसीकरण केंद्रे आहे आता डोसच शिल्लक नसल्याने सर्व केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe