शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

नेवासा – तालुक्यातील लांडेवाडी येथील योगेश अण्णासाहेब दरंदले, वय २७ या शेतकऱ्याचा शेतात काम करताना सर्प दंशाने मृत्यू झाला.

त्यांना सोनई, नगर येथे दवाखान्यात केले असता उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, चुलते, चुलती, आजी असा परिवार असून योगेश यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment