मिनी लॉकडाऊनचा तुघलकी फर्मान मागे घ्यावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- मिनी लॉकडाऊनचा निर्णय मागे घेऊन लादण्यात आलेल्या कठोर नियमामध्ये शिथीलता करण्याची मागणी विश्‍व मानव अधिकार परिषदेच्यावतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजीम शेख, प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, प्रदेश सचिव सय्यदशफी बाबा, अल्ताफ शेख,

अ‍ॅड.निलेश कांबळे, शहर अध्यक्ष चंद्रकांत उजागरे, शादाब कुरेशी, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, रफिक सय्यद, शाहबाज खान, ललित कांबळे, वाहिद शेख, अरुण कोंडके आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन पुकारुन पुर्णत: लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे होणारे नुकसान भरुन निघणार नाही.

हातावर पोट भरणारे हॉकर्स, छोटे-मोठे व्यापारी, गॅरेज, टेलर, जीम चालक, इलेक्ट्रेशियन, पान टपरीधारक यांचा कोणत्याही प्रकारे विचार न करता त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहे.

अशा हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाचा प्रश्‍न ऐरणीवर येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सर्वसामान्यांचा विचार करुन मिनी लॉकडाऊनचा तुघलकी फर्मान मागे घेण्याची मागणी विश्‍व मानव अधिकार परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe