स्वस्तातले सोने पडले महागात ; पुणेकराला टोळक्याने 10 लाखांना गंडवले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने पुणे शहरातील हडपसर येथील व्यक्तीला जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे बोलावून १५ ते २० जणांच्या टोळीने लुटल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणीमोसीन अब्दुल जब्बार (वय ३३, रा. हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे शहरातील हडपसर येथील मोसीन जब्बार यांना अमोल काळे (पूर्ण नाव माहीत नाही), रामा (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी स्वस्तात सोने देऊ असे सांगितले.

यानंतर आरोपींनी तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) या परिसरात ३१ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास जब्बार यांना बोलाविले.

त्यावेळी तेथे १५ ते २० जण दबा धरून बसले होते. अमोल काळे व रामा याने इशारा करताच दबा धरून बसलेल्यांनी जब्बार यांच्या हातातील १० लाख रुपये, सात हजार रुपयांचे दोन मोबाईल कोयता व तलवारीचा धाक दाखवून लुटून नेले.

याबाबत त्या व्यक्तीने गुरुवारी (दि.८ एप्रिल) जामखेड पोलिसात फिर्याद दिली. यावरून १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe