धक्कादायक ! घरात घुसून तरुणाला पेटवून दिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-विशाल पांडुरंग चव्हाण या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे घडला आहे.

या प्रकरणाने तालुक्यात एकच खलबल उडाली आहे.दरम्यान या प्रकणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमूल अरण्या पवार (रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा) याने विशाल चव्हाण याला रस्त्यात अडविले. तुझ्या बापाने माझ्या बायकोला जाळून मारले आहे.

मी तुला सोडणार नाही, अशी दमदाटी करत त्याने विशाल व त्याची आई अनिता यांना मारहाण केली. त्यानंतर अमूल पवार, सागर कान्हू काळे, तुषार कान्हू काळे, कांग्या कान्हू काळे,

मंदिनी सागर काळे, सागर शांताराम चव्हाण, पग्या मिलट्या पवार (सर्व रा. पेडगाव झोपडपट्टी, ता. श्रीगोंदा) यांनी विशाल चव्हाण याच्या घरात घुसून त्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली.

सोबत आणलेले पेट्रोल विशालच्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गट करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe