श्रीगोंद्यात २ लाख ८३ हजारांच्या बनावट नोटांसह एक ताब्यात ! कनेक्शन थेट बारामती पर्यंत…

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरात बुधवारी एका व्यक्तीला बनावट नोटासह ताब्यात घेतले.

तो बनावट बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. यांच्याकडे दोन लाख ८३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

हे बनावट नोटांची लिंक थेट बारामतीपर्यंत असून रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल झाला.

अतुल रघुनाथ आगरकर (रा. जवळेवाडी, सुपा ता. पारनेर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

श्रीगोंदे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी,

श्रीगोंदे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्या पथकाने हा सापळा लावण्यात आला होता.

यात बनावट नोटा घेऊन आलेला हा व्यक्ती २ लाख ८३ हजार रुपये बनावट देऊन सोने खरेदी करणार होता.

हा एमएच १२ एनई या कारमधून बनावट नोटा देऊन सोने खरेदी करण्यासाठी आला.

त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला. या गाडीमध्ये अतुल रघुनाथ आगरकर (रा. जवळेवाडी, सुपा ता. पारनेर) हा बनावट नोटा रक्कम रुपये २ लाख ८३ हजार रुपयांसह मिळाला.

त्याच्याजवळ दोन हजारांच्या ९२ नोटा व ५०० रुपयांच्या १९९ नोटा बनावट सापडल्या.

बनावट नोटा त्याने माने नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. त्याचा शोध व घरातील झडती घेत आहोत. त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment