अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मायंबा येथील मच्छिद्रनाथांचा ९ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान होणारा समाधी उत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे. प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून विधी होतील.
देवस्थान समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थच्या संयुक्त बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली .
कोरोनाचा फटका सर्वच यात्रा उत्सवांना बसत असून लाखोची उलाढाल ठप्प झाली आहे मच्छिंद्रनाथ गडावर पाडव्याच्या आदल्या दिवशीच्या यात्रेला महत्त्व असते.
ठाणे, पुणे, कल्याण, पनवेल, नाशिक, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातून सुमारे दोन लाख भाविक मायंबा गडावर येतात. ओल्या कपड्याने समाधी पूजा होते. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार कमीत कमी पदाधिकारी, पुजारी, ग्रामस्थ पूजा करतील. गावातील भाविक कावडी आणून समाधी पूजन करतील.
अन्य भाविकांना प्रवेश मिळणार नाही. व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा दिली जाणार नाही. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच रांजेद्र म्हस्के व मायंबा देवस्थान समितीने केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|